संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी साखरपा-देवरूख मार्ग दाभोळे-राजापूर मार्ग वाहनचालकांनी स्वीकारला आहे; मात्र या मार्गावरील खड्यांमुळे आणि अर्धवट कामांमुळे वाहने संगमेश्वर देवरूख मार्गावर वळवल्याने वाहनांच्या रांगा या मार्गावर पाहायला मिळत आहेत.
संगमेश्वर ते आरवली या अपघातप्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. ठेकेदार कंपनीने कोणत्याही प्रकारचे पूर्वनियोजन न करता काम सुरू केल्याने सद्यःस्थितीमध्ये चालू असलेल्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच पुलांची कामे सुरू असल्याने अनेक ई ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. वाहतूककोंडीमुळे एक तासाच्या प्रवासासाठी दोन ते तीन तास लागत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनचालकांनी याला पर्याय म्हणून जवळचा संगमेश्वर-दाभोळेमार्गे वाटुळ-राजापूर असा पर्याय निवडला आहे; मात्र यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. याचा फटका देवरूख मार्गाकडे जाणाऱ्या दररोजच्या वाहनांना बसत आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची मोठी वाहतूक सुरू असून, दुचाकी, इतर छोट्या वाहनांचे अपघात होत आहेत.
महामार्गावर या मार्गावरून जाणाऱ्या रात्रीच्यादरम्याने धावणाऱ्या वाहनांवर मर्यादा आणण्यात यावी, अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वीच केबल टाकत असताना साईडरस्ता खोदून मातीचा भराव टाकण्यात आल्याने त्याचा फटकाही या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना बसत आहे.दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 07/Apr/2025














