खेड : खेड शहरातील जगबुडी नदीपात्रातून गाळ उपसण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. अलोरे जलसंपदा विभागाची यंत्रणा आणि नाम फाऊंडेशनची यंत्रणा नदीपात्रात कार्यरत आहे. मार्चअखेरीस जगबुडी नदीपात्रातून ४ हजार ४७१ घनमीटर गाळ उपसण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
दोन पोकलेनच्या साहाय्याने सकाळपासूनच गाळ उपसा प्रक्रिया सुरू होत आहे. दुपारच्या सुमारास यंत्रणांना विश्रांती घ्यावी लागत आहे. उपसलेला गाळ खासगी डंपरद्वारे शेतकरी वाहून नेत आहेत. नाम फाऊंडेशनची यंत्रणाही गाळ उपसा प्रक्रियेत सहभागी झाल्याने गती मिळाली आहे. अलोरे जलसंपदा विभागाने मार्चअखेरीस १५८० ब्रास गाळ उपसला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 07/Apr/2025














