दापोली : वाढल्या ऊनामुळे पाण्याची पातळी खालावत असल्याने तालुक्यातील उन्हवरे येथून यावर्षीच्या हंगामात तालुक्यातील पहिल्या पाण्याच्या टँकरची मागणी पंचायत समितीकडे करण्यात आली आहे. उष्णतेने दापोलीकर हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची पातळीही कमी झाली आहे.
त्यामुळे पाण्याच्या टँकरची मागणी होण्यास प्रारंभ झाला आहे. उन्हवरेतून पहिल्यांदा टँकरची मागणी झाली आहे. येत्या काही दिवसांत या गावात पाण्याचा टँकर सुरू करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 07/Apr/2025














