खेड : उन्हाळी सुट्टीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ७ एप्रिल ते ५ मे पर्यंत एलटीटी-मडगाव उन्हाळी साप्ताहिक स्पेशल धावणार आहे. स्पेशलच्या १० फेऱ्या धावणार आहे
०११०३/०११०४ क्रमांकाची एलटीटी-मडगाव साप्ताहिक स्पेशल दर सोमवारी एलटीटीहून सकाळी ८.२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ९.४० वाजता मडगाव येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात दर रविवारी मडगाव येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता एलटीटीला पोहचेल. ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आदी स्थानकात थांबे देण्यात आले आहेत.
मडगाव-एलटीटी स्पेशल सेवेत
कोकण मार्गावर उन्हाळी सुट्टीसाठी जाहीर झालेली २० एलएचबी डब्यांची मडगाव-एलटीटी उन्हाळी स्पेशल रविवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. ५ मे पर्यंत दर रविवारी तर परतीच्या प्रवासात दर सोमवारी स्पेशल धावणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 07/Apr/2025














