गुहागर बायपास रोड येथील सर्व्हिस रोडचे काम सुरू

चिपळूण : शहरातील गुहागर बायपास रोड येथील सर्व्हिस रोड व मोरीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे हा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. वाहनचालकांना सद्यस्थितीत पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.

शहरातील चौपदरीकरणाचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. मात्र, शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाचे काम अपूर्ण आहे. त्या उड्डाण पुलासाठी डिसेंबर २०२६ ची डेडलाईन देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अर्धवट स्थितीत असलेल्या सर्व्हस रोडचे काम हाती घेण्यात आले आहे.

पाग, पागमळा भागातील सव्र्व्हस रोडचे काम शनिवारी रात्रीपासून सुरू करण्यात आले असून गुहागर बायपास रोड ज्या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाला मिळतो, त्या ठिकाणी काम सुरू आहे. या ठिकाणी गुहागर बायपास मार्गाला ओलांडून जाणारी मोरी बांधण्यात येत आहे.

या शिवाय सव्हींस रोडचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. अनेकजणांना याची माहिती नसल्याने गैरसोय होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 08/Apr/2025