दापोली : नदीत बुडून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दापोली, दि. 0८ एप्रिल 2025: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात सोमवार, दि. 07 एप्रिल 2025 रोजी एक दुर्दैवी घटना घडली. दुपारी 15:30 वाजेच्या सुमारास कोडजाई नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या प्रकाश अनंत तांबे (वय 38, रा. आपटी तांबेवाडी, ता. दापोली) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर रात्री 20:53 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रकाश तांबे हे दि. 07 एप्रिल 2025 रोजी दुपारी आपल्या मित्रांसोबत दारूच्या नशेत कोडजाई नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. माहितीनुसार, ते खेल डोहात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने डोहात बुडाले. त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दारूच्या नशेत पोहण्याचा प्रयत्न करणे ही घटना घडण्याचे प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात दि. 07 एप्रिल 2025 रोजी रात्री 22:32 वाजता आमृ. क्रमांक 26/2025 अंतर्गत करण्यात आली. भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.एस.) 194 अंतर्गत संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 08-04-2025