दिल्लीत ३० एप्रिलपासून दोन दिवसांचा हापूस आंबा महोत्सव

रत्नागिरी : कोकणातील जगभर प्रसिद्ध असलेला हापूस आंबा आता थेट दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जाणार आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकारातून राजधानीत प्रथमच ‘हापूस आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरू होऊन महाराष्ट्र दिनापर्यंत (ता. १ मे) सुरू राहणार आहे.

हापूस आंबा महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी जोगेश्वरी येथे मातोश्री क्लबवर विशेष बैठक झाली यावेळी खासदार रवींद्र वायकर यांच्यासह मनीषा वायकर, ग्लोबल संस्थापक संजय यादव, प्रगतिशील आंबा बागायतदार, निर्यातदार डॉ. दीपक परब, नरेंद्र बामणे देवगडचे आंबा बागायतदार वारीक प्रसाद मालमेकर, दीपक उपळेकर राजश्री यादवराव आदी उपस्थित होते.

दिल्लीतील महोत्सवात आंबा बागायतदार प्रगतिशील फळप्रक्रिया उत्पादक सहभागी होणार हापूस आंबा बरोबरच फणस, काजू, जांभूळ, कोकम, करवंद आणि अशा अनेक कोकणातल्या खास फळांचे व त्यावर आधारित आकर्षक प्रदर्शन होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती जगदीप परखड केंद्रीय मंत्री, खासदार, आयएएस अधिकारी, दिल्लीतील मराठी उद्दोजक फळ व्यापारी आणि मराठी समाजातील मान्यवर व्यक्ती यांना निमंत्रण देण्यात आली आहेत. या उपक्रमामार्फत कोकणातील फलोत्पादन क्षेत्राला राष्ट्रीय पातली एक ओळख मिळणार असून, कोकणाच्या प्रगतिशील शेतकरी आणि उद्दोजकांचे शिष्टमंडळ पंतप्रधान, राष्ट्रपती व विविध मान्यवरांशी थेट संवाद साधणार आहेत यामध्ये कोकण विकासासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा होणार असून, भविष्यातील धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे, असे यादवराव यांनी सांगितले.

हापूस थेट देशभरातील ग्राहकांपर्यंत
दिल्लीतील महोत्सवानिमित्त यावर्षीपासून कोकणातील शेतकऱ्यांना त्यांच्या अस्सल हापूस आंब्याचे देशभरात प्रचार आणि विक्रीसाठी स्वतंत्र होलसेल मार्केट आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्नाटकडून येणाऱ्या नकली हापूस आंब्याची भेसळ थांबवता येणार असून, शुद्ध आणि दर्जेदार कोकणचा हापूस मुंबई, पुणे आणि देशभरातील ग्राहकांपर्यंत थेट पोहोचेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 08/Apr/2025