खेरशेत येथे टँकरची कारला धडक; चालकाविरुद्ध गुन्हा

सावर्डे : मुंबई-गोवा महामार्गावर खेरशेत येथे एका टँकरने कारला धडक दिल्याने कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना १० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कारचालकाने सावर्डे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन भगवानदास जाधव (वय ४७, सध्या रा. कल्याण, मूळ रा. रत्नागिरी) हे त्यांच्या निसांन्स मॅग्नाईट कार क्रमांक एम.एच. ०४ एम.ए. ०५६३ मधून मुंबईहून रत्नागिरीकडे जात होते. खेरशेत टोलनाक्याच्या पुढे हॉटेल आरोही आणि चायनीज कॉर्नरसमोर मुंबई बाजूकडून येणाऱ्या टँकर (एम.एच. ०४ एम.ए. ०५६३) च्या चालकाने निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे गाडी चालवत त्यांच्या कारला धडक दिली. या धडकेत फिर्यादी यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी फिर्यादी नितीन जाधव यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी टैंकर चालक मुकेश लादुलाल कुम्हार (वय ४०, रा. राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 11/Apr/2025