संगमेश्वर : आंबेड बुद्रुक येथे प्रवासी शेडचे लोकार्पण

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस वरदान ठरल्या आहेत. अशाच आंबेड बुद्रुक येथील एसटी थांब्याला माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रवासी शेड उभी करून दिली. याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.

एसटी थांब्याला प्रवासी शेड नसल्याची बाब भाजपच्या नुपुरा मुळ्ये व राजेश आंबेकर यांनी राज्याचे माजी सा. बां. मंत्री, भाजपा कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली होती. याबाबत शिल्पा मराठे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून आ. चव्हाण यांच्या माध्यमातून आंबेड बु. धनगरवाडी येथे प्रवासी निवारा शेडसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. तालुका सरचिटणीस अमित ताठरे यांनी शेडसाठी जागा उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाला भाजपा महिला मोर्चाच्या शिल्पा मराठे, वर्षा ढेकणे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, अमित केतकर, तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के आदी पदाधिकारी ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 15/Apr/2025