रत्नागिरी : तालुक्यातील चिंद्रवली कोनी येथील पऱ्यात पाय घसरुन पडल्यामुळे आसाम येथील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वा. सुमारास घडली.
धन दामर चेत्री (३३, रा. लकला, जि. तिनसुळीया, आसाम) असे पाय घसरुन पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी तो गोव्यातील थिवी ते हजरत निजामुद्दीन असा प्रवास करत असताना निवसर रेल्वे स्टेशनवर उतरला होता. त्या नंतर तो रेल्वे स्टेशनच्या विरुद्ध बाजूला जाऊन तेथून चिंद्रवली कोनी येथील पऱ्यातून चालत जात असताना त्याचा पाय घसरुन पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 AM 16/Apr/2025














