चिपळूण : शहरातील छत्रपती शिवाजी चौकानजीक असलेल्या डॉ. जगताप आरोग्य धाम कंपाऊंडमध्ये १४ रोजी रात्री ८:४५ च्या सुमारास नारळाच्या झाडाने अचानक पेट घेतल्याने धावपळ उडाली. मात्र, नगर परिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाल्याने आग विझविण्यात आली. सोमवारी रात्री ८:४५ च्या सुमारास लागलेली आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, या परिसरात कंपाऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची झाडे आहेत. त्यात नारळाची उंच झाडे आहेत.
तसेच कोपऱ्यावर परिसराला विद्युत पुरवठा करणारे उच्च दाबाचे रोहित्र आहे. अशावेळी बहुतांशवेळी जोरदार वाऱ्यामुळे उंच झाडांच्या फांद्या अथवा नारळाची झावळी प्रवाहीत वीजवाहिनीवर पडून वीजपुरवठा खंडीत होणे किंवा झाडाच्या फांद्या पेट घेण्याच्या घटना याहीपूर्वी घडल्या आहेत. तशाचप्रकारे ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 16/Apr/2025














