राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या नगर परिषदेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यानी बेमुदत संप सुरु केला आहे. अशा आशयाचे पत्र नगर परिषद प्रशासनामार्फत ठेकेदार कंपनीला दिले आहे.
कंत्राटी पध्दतीने घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन VDK या ठेकेदार कंपनीने थकवल्याने व शासनाकडून दिलेल्या परीपत्रकात देण्यात आलेली कर्मचाऱ्याच्या वेतनाची रकम आणि ठेकेदार कंपनी कर्मचाऱ्यांना देत असलेल्या वेतनाची रक्कम यामध्ये खुप मोठी तफावत असल्याने सबंधीत ठेकेदार कंपनीच्या विरोधात कंत्राटी पध्दतीने काम करणारे कर्मचारी संपात उतरले आहेत.
राजापूर नगर परिषदेमध्ये या ठेकेदार कंपनीच्या अंतर्गत सफाई कर्मचारी, बांधकाम कर्मचारी, व डाटा ऑपरेटर या पदावर काम करत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांना किमान वेतना प्रमाणे वेतन दिले जात नाही. तसेच किमान वेतनाच्या अर्ध्या पेक्षा कमी वेतन देण्यात येते. ते देखील कर्मचाऱ्यांकडून कंपनी सुपरवायझरला वारंवार फोन करुन वेतनाची मागणी करून देखील वेळेत मिळत नसल्याचे उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांकडे बोलताना सांगितले.
एका कर्मचाऱ्याला सर्व भत्ते मिळून २२ ते २३ हजारा पर्यंत किमान वेतन मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र अर्ध्याहून कमी वेतन कंपनीकडून दिले जात असल्याचे उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच नगर परिषद प्रशासनाकडून अधीक माहिती घेतली असता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हजेरी पटावर ४८ कर्मचारी असून प्रत्यक्षात मात्र ३९ कर्मचारी राजापूर नगर परिषदेमध्ये कार्यरत असून उर्वरीत कर्मचारी आहेत कुठे? की ठेकेदार कंपनीकडून त्या कर्मचाऱ्यांच्या नावावर शासनाकडून पैसे उकळत आहे की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शासनाकडून जर सर्व भत्त्यासहीत एवढी रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी कंपनीला दिली जात असेल तर संबधीत ठेकेदार कंपनी अर्ध्याहून कमी वेतन देवून कंत्राटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहे असे बोलले जात आहे.
VDK या ठेकेदार कंपनीच्या विरोधात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिल पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. तसेच जोपर्यंत शासनाकडून दिले जाणारे पूर्ण वेतन कंपनी कडून दिले जात नाही व तो पर्यंत संप सुरुच रहाणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 16/Apr/2025














