चिपळूण : ‘डीबीजे’ महाविद्यालयात १८ तास अभ्यास अभियान

चिपळूण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त २०१५ या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षापासून डीबीजे महाविद्यालयाने ‘सलग १८ तास अभ्यास अभियान’ राबवण्यास सुरूवात केली. यावर्षीदेखील बाबासाहेबांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १२ एप्रिल रोजी दुपारी, १३ एप्रिल सकाळी ६ पर्यंत हे अभियान राबविले.

या अभियानाचे उद्घाटन डीबीजे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. संजय गवाळे आणि डॉ. जी. एल. ठाकूर यांच्या हस्ते झाले. ग्रंथपाल डॉ. सुधीर मोरे यांनी १८ तास अभियानाचे प्रयोजनाबाबत माहिती दिली. डॉ. संजय गवाळे यांनी या उपक्रमाचे फायदे स्पष्ट करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी वाचनाचं महत्त्व आणि वाचनाचा व्यक्तिमत्त्वावरील सकारात्मक
परिणाम याबाबत विचार व्यक्त केले. डॉ. ज्ञानोबा कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

प्रा. नाली खर्चे यांनी आभार मानले. अभियानाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विषद करणाऱ्या विविध पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात आले. ही पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होती. या वर्षीच्या सलग १८ तास अभियानाला भरघोस प्रतिसाद मिळाला. एकूण ३७ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. निशा आडविलकर, लाघवी सावले, साक्षी मोहिते, उन्नती मिरगल, सानिका गडदे, चेतन मोहिते, क्रिश गमरे, आदित्य मोहिते, आर्यन डाकवे आदी विद्यार्थ्यांसह उपप्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, उपप्राचार्य डॉ. चेतन आठवले, डॉ. बी.एस. कांबळे, प्रा. उदय बामणे, प्रा. विवेक जाधव, प्रा. प्राजक्ता पिसे, प्रा. करिश्मा सागवेकर, प्रा. नलावडे, डॉ. ज्ञानोबा कदम, प्रा. सोनाली खर्चे, भगवान वाघ हे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.

हा संपूर्ण उपक्रम राबवितांना न. ए. सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. माधव बापट यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी ग्रंथपाल डॉ. सुधीर मोरे, नितीन सकपाळ, गुरूनाथ साळुंखे, प्रणित मोहिते आणि माजी ग्रंथालय परिचर प्रभाकर लाड यांचे सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 16/Apr/2025