रत्नागिरी : शहरातील तेली आळी येथे सार्वजनिक रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरडा करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई १४ एप्रिल रोजी दुपारी २.३० वा. सुमारास करण्यात आली. आशिष शंकर आडविलकर (५०, रा. तेली आळी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सोमवारी दुपारी तो दारुच्या नशेत तेली आळी येथील सार्वजनिक रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरडा व हातवारे करुन असभ्य वर्तन करत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८५ (१) (२), महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११०/११७प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 16/Apr/2025














