रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे १७ ते २१ एप्रिल या कालावधीत तालुकास्तरीय नमन स्पर्धेचे आयोजन केले आहे. सायंकाळी सहा वाजता मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ही स्पर्धा होईल. स्पर्धेत दहा नमन मंडळांनी सहभाग नोंदविला आहे.
विजेत्या पहिल्या तीन मंडळांना अनुक्रमे प्रथम पारितोषिक ५१ हजार, द्वितीय ४१ हजार आणि तृतीय ३१ हजार अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. या व्यतिरिक्त सहा वैयक्तिक सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये उत्कृष्ट स्त्री-पात्र, उत्कृष्ट मृदंग वादक, उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट विनोदी अभिनय, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वेशभूषा आणि उत्कृष्ट बालकलाकार अशी वैयक्तिक बक्षिसे असतील.
या सोहळ्यासाठी कुठलेही शुल्क असणार नाही. लोककलेच्या आनंददायी सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जिजाऊ संस्थेचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर, सचिव केदार चव्हाण, तालुकाध्यक्ष मंदार नैकर, लांजा तालुकाप्रमुख योगेश पांचाळ यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 16/Apr/2025
