रत्नागिरी : येथील मारुती कंपनीचे अधिकृत विक्रेते जागृत मोटर्स प्रा. लि. येथील अनेक कामगारांनी मनसे कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारले. त्याच्या फलकाचे अनावरण महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उपाध्यक्ष वैभव शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कामगार सेना चिटणीस गणेश खंदारे, चिटणीस मनोज रामाराजे, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, शहर अध्यक्ष बाबय भाटकर, शहर सचिव प्रभात सुर्वे उपस्थित होते. त्यानंतर द्वारसभादेखील पार पडली.द्वारसभेमध्ये मार्गदर्शन करताना वैभव शेट्ये यांनी कामगारांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात मनसे नक्कीच आवाज उठवणार व न्याय मिळवून देणार असे सांगितले. नंतर मनसेच्या शिष्ट मंडळाने कंपनी मॅनेजमेंटची भेट घेऊन कामगारांच्या बाजूने अनेक गोष्टी मांडल्या. त्यावर आगामी काही दिवसांत ठोस उपाययोजना न झाल्यास कामगार सेना आणि मॅनेजमेंट यांचा कायदेशीर संघर्ष अटळ असेल, असेदेखील यावेळी ठणकावून सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:00 22-04-2025














