राजापूर शहरात आजपासून एकदिवसाआड पाणी

राजापूर : राजापूर शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य जलस्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणातील पाणीसाठा खालावला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी शहरवासीयांना शीळ जॅकवेलवर अवलंबून राहावे लागणार आहे. तिथेही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. त्यामुळे राजापूर शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले असून, त्याची अंमलबजावणी आजपासून (ता. १६) होणार आहे.

वाढत्या तापमानात सायबाच्या धरणातील पाणीसाठा कमी झालेला आहे. वाढत्या उष्म्यामुळे दिवसागणिक त्यात घट होत आहे. पाणीपुरवठ्याचा दुसरा पर्याय असलेल्या शीळ जॅकवेल येथे पाणीसाठा मुबलक आहे परंतु त्या ठिकाणी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवल्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी, नगरपालिकेने पाणीपुरवठा एक दिव्साबाह करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून (ता.१६) एकदिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. त्यात चव्हाणवाडी विभागः रूमडेवाडी, शेटो, धालवकर घाटी, भटाळी वेदशाळा, पंचायत समिती, गोरुले सर्जन, कोर्टापासून आंबेडकर वस्तीगृहापर्यंत, यश अपार्टमेंट, टेलिफोन एक्चेंज, खडपेवाडी, जवाहर चौक भटाळी मुल्लाचठार झरीलाईन खान, खलिफे वगैरे काझी, चव्हाणवाडी, परिटघाटी, व्यायामशाळा बाजारपेठ विभागः भोगटे लाईन, आशियान बिल्डिंग कुडाळकर लाईन, नाखवा, खतीब संत रोहिदासवाडी, बौद्धवाडी, वरचीपेठ, मापारीलाईन, मुन्शीनाका ते जवाहर चौक, आना मिरजकरी घाटी, सनामुल्ला, मुन्शीनाका ते लोकमान्य हॉटेल, मिरजकर, बिल्डिंग, विचारे साईन, बावकर, पारकर आनंद, लिगम घाटी, करगीर, रेस्टहाऊस, कातारी, मांजरेघाटी, जावकरघाटी, साईनगर पुनर्वसन विभाग, सनम लाईन, प्रियदर्शनी नं. २ (मेश्वी गुरव), रानतळे विभाग मुल्ला मास्तर रेखाले दुकानापर्यंत.

गुरुवारपासून (ता.१७) पाणीपुरवठा होणाऱ्या विभागात कोंढेतड विभागः बारगीर, काझी अभ्यंकर घरापर्यंत, सातकुट घाटी, मोकाशी लाईन, कोंडकर लाईनपर्यंत वाडीवाले, हवालदार लाईन, मुजावर लाईन, भंडारवाडी, बौद्धवाडी कुलेंवठार, कुवेसकर, काझी घरापर्यंत तालीमखाना पंपहाऊस, साईनगर पुनवर्सन वसाहत, पेट्रोलपंप गुरववाडी, रॉयल कॉम्प्लेक्स, चौगुले रेसिडेन्सी, रॉयल बिल्डिंग, मालिम बिल्डिंग, बंगलवाडी गुरववाडी, एसटी डेपो, सांबळ गुरववाडी, प्रियदर्शनी वसाहत नं. १, एसटी डेपो, एसटी डेपो खालील गुरववाडी, भाई जाधव कोर्ट, कचेरी लाईन, पोस्ट, बावधनकर, चौगुले, गवळी, पवार, काझी वैगेरे, धोपेश्वरपाटी, दिवटेवाडी, खपेवाडी विभागः तांबेलाईन, आरेकर, पवार, डंबे, शिंदे लाईन, लांजेकर, मांडवकर लाईन, दिवटेलाईन, बाणेपार, गार्डी लांजेकर, वादक, दुदम, सोगमलईन, परांजपे, साखळकर भंडारवाडी लाईन. १ (२ साखळकरवाडी लाईन) (रहाटे घाटी, पाटकर माटी, खडपेवाडी),

खडपेवाडी दातारप्रेस गुजराळी, बागकाझी, भावेवाडा, धुमक लाईन, गोंडाळ लाईन, खालची ओगलेवाडी, वरची ओगलेवाडी, रानतळे विभाग, मोडाळ, बावधनका, साखळकर, मांजरेकर व इतर. या व्यतिरिक्त आंबेवाडी विभागाला गुरुवार (ता.१७), शनिवार (ता. १९) याप्रमाणे पाणीपुरवठा होगार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोदवली येथील सायबाच्या धरणातील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आतापासूनच नियोजन सुरू केलेले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. – जितेंद्र जाधव, मुख्य लिपिक, राजापूर नगरपालिका

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 16/Apr/2025