राजापूर : वाटूळमध्ये १ मे रोजी पालखी नृत्य स्पर्धा

राजापूर : तालुक्यातील वाटूळ येथील शिव प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील प्रथम ३ क्रमांकांना अनुक्रमे रोख १० हजार, ७ हजार, ३ हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा वाटूळ येथील गगनगिरी आश्रमाच्या बाजूला रात्री ८ ते ११. दरम्यान होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 16/Apr/2025