Ratnagiri : सरपंचपदाच्या आरक्षणाची २२ एप्रिल रोजी सोडत

रत्नागिरी : जिल्ह्याकरिता सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आणि महिलासाठी पुढील पाच वर्षाकरिता आरक्षण करून सरपंचपदाची संख्या निश्चित केली आहे.

सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत येत्या २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.

याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी ती लागू राहणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंच आणि उपसरपंच निवडणुकीच्या तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी नियमानुसार योग्य त्या प्रमाणात तसेच सर्वसाधारण स्त्रियांसाठी आरक्षित करावयाच्या सरपंचपदांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार सर्व तहसीलदारांना प्रदान केले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 17-04-2025