खेड : सध्या तापमानात वाढ झाली आहे, उष्म्याने हैराण झालेले लोक उन्हाळ्यात थंड पेय, नारळ पणणी तसेच ताडगोळ्यांनाही पसंती देतात. काही अमराठी लोक कोकणात ताडगोळे विक्रीसाठी घेऊन दाखल झाले आहेत. परंतु हे लोक ताडगोळे गटारातील पाण्याने स्वच्छ करत असल्याचा किळसवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. परप्रांतीय व्यावसायिक जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचे यामुळे समोर आले आहे.

आरोग्य यंत्रणेकडून या ताडगोळे विक्रेत्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणातही ताडगोळे घेऊन परप्रांतीय मोठ्या संख्येने विक्रीसाठी दाखल झाले आहेत. खेड तहसीलदार कार्यालयाच्या समोरच ताडगोळे विक्रेता गटारातील वाहत्या पाण्यात ताडगोळे स्वच्छ करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित परप्रांतीय ताडगोळे विक्रेत्यांवर तातडीने आरोग्य विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 17/Apr/2025














