राजापूर : तळगाव येथे ९ खैराच्या झाडांची चोरी, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राजापूर, १७ एप्रिल २०२५ : राजापूर तालुक्यातील तळगाव, वाकिरले येथे ४०,००० रुपये किमतीच्या ९ खैराच्या झाडांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सुधाकर महादेव लाड (वय ५५, रा. तळगाव वरचीवाडी, सध्या मुंबई) यांच्या तक्रारीवरून विलास धाकु सावंत (रा. तळगाव सावंतवाडी), भुषण विलास सावंत (रा. तळगाव सावंतवाडी), गंगाराम रघुनाथ सावंत (रा. तळगाव माळनाका), तेजस अजित पोटफोडे (रा. तळगाव तांबटवाडी), सर्वेश किशोर पोटफोडे (रा. तळगाव तांबटवाडी), उमाजी महादेव सौंदळकर (रा. तळगाव नवानगर), तुकाराम महादेव सौंदळकर (रा. तळगाव नवानगर) या सात जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुधाकर लाड यांच्या मालकीच्या आणि त्यांच्या हिश्शाच्या जमिनीवर ही चोरी १ फेब्रुवारी २०२५ ते ७ एप्रिल २०२५ या कालावधीत घडली. आरोपींनी फिर्यादींची कोणतीही परवानगी न घेता, लबाडीच्या हेतूने आणि स्वतःच्या फायद्यासाठी ९ खैराची झाडे खणून काढली आणि चोरून नेली. ही घटना ७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता उघडकीस आली. या प्रकरणी राजापूर पोलिस स्टेशनमध्ये १६ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०:४३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 17-04-2025