संगमेश्वर, १७ एप्रिल २०२५ : देवरुख-रत्नागिरी रोडवरील पूर फाटा, ता. संगमेश्वर येथे १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता डंपर आणि ओमनी कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी डंपर चालक डिस्को आजत तुरी (रा. हंडाडी, ता. पंचबा, जि. ग्रिडी, झारखंड) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुरेश गणपत वेले (वय ५८, रा. पुर वेलेवाडी, ता. संगमेश्वर) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी डिस्को आजत तुरी हा अशोक लेलैंड डंपर (क्रमांक MH08/AP 8406) खडी भरून मौजे मोडे ते किरदाडी असा देवरुख-रत्नागिरी रोडने घेऊन जात होता. यावेळी त्याने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता अतिवेगाने, बेदरकारपणे आणि हयगयीने वाहन चालवले. पूर फाटा येथील चढावावर डंपरने समोरून येणाऱ्या ओमनी कार (क्रमांक MH08/R 7725) ला जोरदार धडक दिली. यामुळे डंपर पलटी झाले आणि दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
या अपघातात ओमनी कारमधील निलेश विश्वास मुळ्ये (रा. पांगरी ब्राम्हणवाडी, ता. संगमेश्वर), दिनेश विश्वास मुळ्ये (रा. पांगरी ब्राम्हणवाडी, ता. संगमेश्वर) हे दोन प्रवासी जखमी झाले. दोघांच्या हात, पाय आणि शरीरावर लहान-मोठ्या तसेच गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची तक्रार फिर्यादींनी संगमेश्वर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली. त्यानुसार, १६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २:४८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 17-04-2025














