चिपळूण : विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या असल्यामुळे सध्या पोहणे शिकण्यासाठी जलतरण तलावांवर गर्दी वाढली आहे. चिपळूण शहरातील पालिकेच्या जलतरण तलावही सध्या हाऊसफुल्ल होत आहे. येथे प्रशिक्षक असल्याने पोहायला न येणाऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. विशेष म्हणजे येथे महिलांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी महिला प्रशिक्षक आहे.
चिपळूण शहरातील रामतीर्थ तलाव परिसरात पालिकेचे जलतरण तलाव आहे. हे तलाव मागील दोन महिन्यांपासून बंद होते. पालिकेने ते सध्या एका खासगी एजन्सीला चालवण्यासाठी दिले आहे. जलतरण तलाव सुरू झाल्यापासून येथे ५०० नागरिक दिवसाला पोहण्यासाठी येत आहेत. एका नागरिकाकडून तासाला ४० रुपये तिकीट दर आकारले जात आहे. त्यानुसार दिवसाला २० हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न या एजन्सीला मिळत आहे. शहरात हे एकमेव जलतरण तलाव आहे. पंधरा विविध बॅचेसमध्ये येथे पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी मासिक, तिमाही, डेली गेटपासवर शुल्क आकारले जाते. महिला व मुलींकरिता स्पेशल बॅचचे आयोजन केले जाते.
त्यांच्यासाठी ३ प्रशिक्षक आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष बॅचची व्यवस्था करण्यात आली आहे. या जलतरण तलावावर जीवरक्षक उपलब्ध आहेत. सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे
खेळाडूचाही सराव
तलतरण तलावामुळे जलतरणपटूंना सराव करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तलावामुळे अनेकांना जलतरणाची आवड निर्माण होऊन भविष्यात चांगले जलतरणपटू तयार होतील, असा विश्वास नागरिकांतून व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 17/Apr/2025














