खेर्डी-देऊळवाडी परिसरातील अवैध व्यवसायाविरोधात ग्रामस्थांची पोलिस ठाण्यावर धडक

चिपळूण : खेर्डी-देऊळवाडी परिसरात एका घरात अवैध व्यवसाय चालवला जातो. त्यास ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर संबंधित महिलेकडून वाडीतील महिला व ग्रामस्थांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असा आरोप करत संतप्त महिला व ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यावर धडक दिली. उपअधीक्षकांसमोर महिलांनी तक्रारीचा पाढा वाचत तो बेकायदा व्यवसाय तातडीने बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्याशी चर्चा करताना खेर्डी देऊळवाडी येथील महिला व ग्रामस्थ म्हणाले, वाडीत ग्रामस्थांची ४० ते ५० घरे आहेत. या वाडीतूनच खेर्डी-टेरव-रस्ता जातो. ग्रामस्थ व महिलांची रहदारी असलेल्या मार्गावरील एका घरात राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू आहे. तेथे परगावातील अनेक पुरुष मंडळी येत असून दारू पिणे, जुगार खेळणे त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंत डीजे लावून नाचण्याचा प्रकार सुरू असतो. मुख्य रस्त्यावर हा प्रकार सुरू असून, ग्रामस्थांना याचा नाहक त्रास होत आहे.

अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा बंदोबस्त करू, असे आश्वासन पोलिस अधिकारी राजमाने यांनी दिले. यावेळी संतोष तांदळे, मंगेश पवार, संतोष उतेकर, प्रकाश फाळके, दिलीप शेवेकर, अनंत मोरे, समिधा तांदळे, सदस्या सुप्रिया उतेकर, श्रद्धा पवार, सिद्धी पवार, विश्वनाथ फाळके, गोविंद फाळके, राजा पास्टे, संजय सावंत, गोविंद भोसले, गजानन जाधव, सुभाष शेवेकर, दिलीप उतेकर, अविनाश उतेकर, कृष्णा जाधव, सुनील मोरे, संदीप तांदळे, अनिकेत चव्हाण, भारती भोसले, मधुकर तांबीटकर, दीपाली शेवेकर, विजय साळुंखे, लक्ष्मण वायंगणकर, अजित फाळके आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 17/Apr/2025

Mahrashi karve ANM