खेड : खेड नगर परिषदेच्या हद्दीतील ४३ कोटी ४९ लाखांच्या विकास कामाचे भूमिपूजन गृहमंत्री ना. योगेश कदम यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
यामध्ये दवाखाना बांधणे १ कोटी ७७ लाख, गुलमोहर पार्क येथील प्राथमिक शाळा व क्रीडांगण विकसीत करण्यासाठी ३ कोटी ३६ लाख, न. पा. योजना ३८ कोटी, ३५ लाख असे एकूण ४३ कोटी ४९ लाखांच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. या वेळी मुख्याधिकारी महादेव रोडगे, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी सभापती चंद्रकांत कदम, शहरप्रमुख कुंदन सातपुते, माजी उपनगराध्यक्ष सुनिल दरेकर, माजी नगरसेवक संजय मोदी, राजेश बुटाला, सतीश चिकणे, भूषण चिखले, दर्शन महाजन आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:52 PM 17/Apr/2025














