साळिस्ते येथे 12 मे रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ढोल-ताशा वादन स्पर्धा

सिंधुदुर्ग : साळिस्ते गुरववाडी (ता. कणकवली) ग्रामस्थ मंडळातर्फे वार्षिक सत्यनारायण पूजेनिमित्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ढोल-ताशा वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा १२ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल.

दरवर्षीप्रमाणे साळिस्ते गुरववाडी ग्रामस्थ मंडळाने गुरववाडी चव्हाटा येथे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. १२ मे रोजी सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता सुस्वर भजने होतील. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता श्री खांबेश्वर सेवा मित्र मंडळातर्फे ढोल-ताशा वादन स्पर्धेचे उद्घाटन होईल.

स्पर्धेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघ सहभागी होऊ शकतात. त्यासाठी २५ एप्रिलपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या संघांना अनुक्रमे ८ हजार, ६ हजार आणि पाच हजार, तर उत्तेजनार्थ विजेत्या संघाला २ हजार ५०० आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. उत्कृष्ट ढोलवादक, उत्कृष्ट ताशावादक, उत्कृष्ट झांजवादक, उत्कृष्ट ध्वज नाचविणाऱ्यांना प्रत्येकी ५०१ रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धा संपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. या स्पर्धेत सहभागासाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क असून सहभागासाठी तेजस गुरव (7066674129), बाळा नारकर (70217 60475), सुशील गुरव (9763164686) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 17-04-2025