खेड : नाम फाऊंडेशनतर्फे नारिंगी नदीपात्रात गाळ उपसा

खेड : जगबुडी नदीपात्रापाठोपाठ नारिंगी नदीपात्रातील गाळ उपसण्यात येत आहे. या गाळ उपसा प्रक्रियेत नाम फाऊंडेशन गेल्या ११ दिवसांपासून सक्रिय झाली आहे. एका पोकलेन मशिनच्या सहाय्याने दिवसभर गाळ उपसा करून सुरक्षित ठिकाणी साठे करण्यात येत आहेत.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या माध्यमातून जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्यासह बेटे काढण्यासाठी २ कोटी ८२ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्याची रखडलेली पक्रिया ४ मार्चपासून सुरू झाली. आतापर्यंत ४,४७१ घनमीटर गाळ उपसा करण्यात आला आहे. जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसा युद्धपातळीवर सुरू असतानाच नारिंगी नदीपात्रातील गाळ उपसा प्रक्रियेत नाम फाऊंडेशनची यंत्रणा सक्रिय झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 17/Apr/2025