रत्नागिरी : शहरातील बोर्डिंग रोड परिसरातील देसाई चाळीत राहणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. नरेंद्र श्रीधर कदम असे त्यांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र कदम यांना मागील पाच महिन्यांपासून कावीळ झाली होती आणि ते आजारी होते. तसेच, ते दारूचे व्यसनी होते. १६ एप्रिल रोजी जेवण करून झोपलेले असताना त्यांना अचानक उलट्या होऊ लागल्या आणि त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 17/Apr/2025














