रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सरचिटणीस व कोकणातील नेते वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज (१७ एप्रिल) रत्नागिरी तालुकाध्यक्ष पदी सचिन शिंदे यांची, तर राजापूर उपजिल्हाध्यक्ष पदी जुनेद बंदरकर यांची वर्णी लावण्यात आली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा विचार करता ‘मनसे’ने रत्नागिरीमधील संघटना बांधणी अत्यंत गांभीर्याने घेतल्या आहेत. रत्नागिरी व राजापूर तालुका व शहर संघटना बांधणी करिता योग्य व्यक्ती निवडून त्यांची मोट बांधणीसाठी सरचिटणीस व कोकणातील ‘मनसे’चे नेते वैभव खेडेकर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
या निवडीप्रसंगी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, रत्नागिरी शहर सचिव प्रभात सुर्वे, राजापूर उपजिल्हाध्यक्ष जुनेद बंदरकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:37 PM 17/Apr/2025














