रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवीहून जळावू लाकूड घेऊन रत्नागिरीकडे येणाऱ्या टेम्पोला फणसवळे रस्त्यावर अपघात झाला. टेम्पोवरिल चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात नेपाळी कामगाराचा गंभीर जखमी झाल्याने उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हरी थापा (२७, सध्या रा. जाकादेवी, मुळ नेपाळ) असे मृत नेपाळी तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वा. सुमारास फणसवळे रस्त्यावर घडली.
टेम्पो चालक परेश गणपत राऊत (३०, रा. निवेंडी, ता. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील टेम्पो (एमएच-०८ एपी २६९२) मधून जळावू लाकुड भरुन जाकादेवी ते रत्नागिरीकडे करबुडे मार्गे येत होता. फणसवळे-शिळ रस्त्यावर आल्यावर परेशचा तेथील रस्त्याच्या उतारात टेम्पोवरील ताबा सुटला व टेम्पो उलटला.
या अपघातात टेम्पोच्या हौद्यात बसलेले हरी थापा (२७), ललित रमते (२८) व राजेश छेत्री (२८, तिघेही रा. जाकादेवी, मूळ रा. नेपाळ) जखमी झाले. टेम्पोतील लाकूड सामान बाजूला करुन जखमींना स्थानिकांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र या अपघातामध्ये गंभीर जखमी हरी थापा याच्यावर उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या बाबत ग्रामीण
अपघातग्रस्त टेपो.
पोलिसांनी खबर देण्यात आली असून ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 AM 18/Apr/2025














