चिपळूणच्या १३० सरपंच पदासाठी २२ एप्रिल रोजी सोडत

चिपळूण : आगामी पाच वर्षांच्या कालावधीकरिता जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सूची जाहीर झाली असून येत्या २२ एप्रिल रोजी संबंधित ग्रामपंचायतींच्या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. २०२५ २०३० कालावधीसाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रवर्गनिहाय सरपंच आरक्षण सूचीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने १३० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदावर कुठल्या जागेसाठी आरक्षण जाहीर होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जिल्हाभरात एकूण ८४७ ग्रा.पं. असून त्यामध्ये चिपळूण तालुक्यात सर्वाधिक जास्त म्हणजे १३३ ग्रा.पं.चा समावेश होतो. पाच वर्षांच्या कालावधीसाठी जिल्हा प्रशासनाकडून सरपंच पदाकरिता आरक्षण सूचीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती, अनु. जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामात्र) आणि खुला प्रवर्ग अशा चार विभागातील आरक्षण दि. २२ एप्रिल रोजी चिपळुणात काढले जाणार आहे. चिपळूण तालुक्यात एकूण १३० ग्रा.पं. असून आरक्षण सूचीनुसार अनु. जातीसाठी पुरुष प्रवर्गात ५, महिला प्रवर्गात २, अनुसूचित जमातीसाठी पुरुष व महिला प्रवर्गात प्रत्येकी १, नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी पुरुष ३५, महिला १९, खुल्या प्रवर्गामध्ये पुरुष ८९, महिलांसाठी ४४ अशी आरक्षणाची कालबद्ध सूची चिपळूण तालुक्यातील १३० ग्रा. पं. साठी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.

मंगळवार २२ एप्रिल रोजी सरपंच पदासाठी चिपळुणात सोडत होत असून अनुसूचित जातीसाठीच्या प्रवर्गात एकूण ५ जागांमध्ये २ महिला, अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी महिला अथवा पुरुष, नामाप्रसाठी ३५ पैकी १९ महिला तर खुल्या प्रवर्गातील ८९ जागांमध्ये ४४ जागांवर महिलांसाठी सोडत काढली जाणार आहे. संबंधित सोडतीत आरक्षित झालेली पदे वगळता उर्वरित जागा त्या-त्या प्रवर्गात पुरुषांसाठी खुल्या राहाणार आहेत.

मागील दहा वर्षांत ज्या ग्रा.पं. मध्ये आरक्षण काढण्यात आले अशा ग्रा.पं. वगळून उर्वरित ग्रा.पं. साठी चारही प्रवर्गातील आरक्षण सोडत काढली जाणार आहे. कुठल्या ग्रा.पं.ला सरपंच पदाच्या आरक्षणाची लॉटरी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 18/Apr/2025