रत्नागिरी : तालुक्यातील वेतोशी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.४५ वा. सुमारास करण्यात आली. महेश रमेश पाचकुडे (३२, रा. उगवीत पाचकुडवेवाडी करबुडे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्या विरोधात महिला पोलिस हवालदार सुगंधा दळवी यांनी तक्रार दिली आहे. संशयित हा आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना सार्व. ठिकाणी दारु पित असताना कारवाई झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 18/Apr/2025














