रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मुरलीधर मंदिरआवार, बंदररोड येथील वासुदेव बाळकृष्ण सप्रे (८७) यांचे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे करण्यात आले. १६ एप्रिल रोजी रात्री वासुदेव सप्रे यांचे निधन झाले होते. वासुदेव सप्रे यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदान साठी संकल्प केला होता त्यानुसार हेमंत वासुदेव सप्रे (मुलगा) व संपदा सुनील जायदे (मुलगी) यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे सप्रे यांचे नेत्रदान प्रकिया पूर्ण केली व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी देहदान केले यावेळी समाजसेवक समीर करमरकर व विनायक शितुत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वासुदेव बाळकृष्ण सप्रे यांनी रत्नागिरीतील मुरलीधर मंदिरात सुमारे ६० वर्ष पुजारी म्हणून कार्य केले तर रत्नागिरीतील शिर्के प्रशाला व गोदूताई जांभेकर विद्यालय येथे लिपिक म्हणून सेवा दिली आहे. त्यांचे देहदान १७ एप्रिल रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे करण्यात आले.
देहदानाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, डॉ. मंजुषा रावळ, शरीररचनाशास्त्र विभागातील कर्मचारी पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, शिपाई मिहिर लोंढे तसेच वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव यांनी काम पाहिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 18/Apr/2025
