साखरपा : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव-साखरपा हद्दीत बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बुधवारी (ता. १६) मध्यरात्री कोंडगाव येथील एका ग्रामस्थाच्या गोठ्यात शिरून एका वासरावर हल्ला केला., बिबट्याच्या हल्ल्यातून स्वतःला वाचवण्यासाठीची त्या वासराची धडपड, आजुबाजूला असलेल्या गायीगुरांची चलबिचल हे सर्व चित्र गोठ्यामध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले होते. ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यास सुरवात केली आहे.
गुरुवारी पहाटेच्या सुमारास कोंडगाव-वाणेवाडी येथील ओंकार कासार यांच्या गोठ्यातील एका गाईच्या वासराचा बिबट्याने बळी घेतला. दोन दिवसांपूर्वी कासार यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याचाही या बिबट्याने बळी घेतला. या घटनेची दृश्ये आणि त्या वासराने फोडलेला हंबरडा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शेजारच्या विनायक गांधी यांच्या परसबागेतून या बिबट्याने कासार यांच्या गोठ्यातील भिंतीवर उडी मारली आणि आत प्रवेश केला. त्यामुळे बिथरलेल्या जनावरांची झालेली चलबिचल सुरू झाली. स्वतःला बिबट्यापासून वाचवण्यासाठीची गोठ्यात दाव्याला बांधलेल्या जनावरांची धडपड सुरू होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 18/Apr/2025














