राजापूर पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन अदा

राजापूर : वेतन थकवल्याप्रकरणी राजापूर पालिकेतील कंत्राटी कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाची तत्काळ दखल घेण्यात आली. संबंधित ठेकेदार कंपनीकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन आदा केले आहे. त्यामुळे पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घेतल्याची माहिती पालिका देण्यात आली.

प्रशासनाकडून राजापूर पालिकेकडून बांधकाम, स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांसह चालक व डाटा ऑपरेटर यांसारखे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले आहेत. कंत्राटी कर्मचारी नियुक्तीचा ठेका देण्यात आलेल्या कंपनीकडून वेळेमध्ये वेतन दिले जात नसल्याची तक्रार पालिकेकडे निवेदनाद्वारे केली होती. याप्रकरणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनही छेडले होते. कामबंद आंदोलनाची दखल घेऊन संबंधित ठेकेदार कंपनीने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत असलेले वेतन आदा केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 18/Apr/2025