पालीत उड्डाणपूल उभारण्यासाठी लगबग !

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर आणि मुंबई-गोवा हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग जोडणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील बाजारपेठेत उड्डाणपूल उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.

महामार्ग चौपदरीकरणामुळे गेली अनेक वर्षे वसलेल्या येथील बाजारपेठेचा चेहरामोहरा बदलला आहे. महामार्गासाठी जागा संपादित केल्यानंतर जुनी दुकाने, हॉटेल, टपऱ्या उचलण्यात आल्या आहेत. तिथे उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू असल्याने क्रेनसह अन्य साहित्य ठेवले आहे.

वाहतूक सुरू ठेवण्यासाठी एका बाजूने सेवा रस्ताही ठेवण्यात आलेला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 19-04-2025

Amey jwelrs