पोलिस असल्याची बतावणी करत चिपळुणात दोघांना लुटले

चिपळूण : दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी पोलिस असल्याचे सांगून ग्रामस्थांना तीन लाख दहा हजारांचा गंडा घातला. त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरून नेले. ता.१७ रोजी दुपारी ही घटना घडली. यासंदर्भात अशोक पोपटराव साठे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती, साठे हे मूळचे अहिल्यानगर (पारनेर) येथील आहेत; मात्र निवृत्त झाल्यानंतर ते चिपळूण शहरातील पाग येथे राहतात.

दुसरे फिर्यादी मोहन विष्णू चाचे आहेत. चाचे यांना खेर्डी येथील प्रभात हॉटेलच्या समोर लुटण्यात आले, तर साठे यांना भोगळे परिसरात लुटण्यात आले.

संशयित काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आले होते. आम्ही पोलिस आहोत. पुढे तुम्हाला लुटण्याचा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे ताबडतोब तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा, असे दोघांना सांगितले आणि हातचलाखीने ते दागिने लुटून घेऊन गेले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर साठे व चाचे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक फूलचंद मेंगडे यांनी गुन्हा नोंद करून घेतला.

Vinayka motars

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 19/Apr/2025