जाकादेवी : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा रत्नागिरी या जिल्हा संघटनेचा जिल्हा मेळावा २० एप्रिल रोजी सकाळी ११ वा. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी साळवी स्टॉप येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष आकाश तांबे हे शिक्षकांच्या समस्या आणि संघटनेचे महत्व या विषयावर विशेष मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी रत्नागिरी जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण बिरादार, कास्ट्राईब संघटना राज्याचे माजी उपाध्यक्ष मिलिंद कदम, राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात शिक्षकांच्या विविध मागण्या, कास्ट्राईब संघटनेने केलेली कार्यवाही, संघटना व्यापकतेसाठीची धोरणे, संघटनेचे विविधांगी उपक्रम आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
या मेळाव्यात विविध स्तरावर उठावदार व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला रत्नागिरी जिल्ह्यातील कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, सभासद, हितचिंतक शिक्षण प्रेमी, तसेच सत्कारमूर्ती यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे, कार्याध्यक्ष प्रदीप पवार, सचिव सुधाकर कांबळे, जिल्हा सहसचिव प्रशांत जाधव यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 19/Apr/2025














