रत्नागिरी : गोळप कट्टा कार्यक्रमात आज डाॅ. प्रज्ञा गोखले यांची मुलाखत

रत्नागिरी : गोळप कट्टाच्या ६६ व्या कार्यक्रमात शनिवारी, दि. १९ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ ते ७.३० या वेळेत पाटणकर कार्यालय, फिनोलेक्स फाटा, गोळप येथे डाॅ. प्रज्ञा गोखले आपला जीवनप्रवास उलगडणार आहेत.

डाॅ. प्रज्ञा गोखले या मूळ मिरज येथील आहेत. प्रतिकूल परिस्थिती असताना शिक्षणाच्या दुर्दम्य ओढीने आणि कष्टाने मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा, बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये BE, MTech आणि डॉक्टरेट तसेच, MBA चे शिक्षण घेतले आहे. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात १६ वर्षे काम करत आहेत. देश विदेशातील कॉन्फरन्समध्ये ३० शोधनिबंध सादर केले आहेत. इमेज प्रोसेसिंग कोडमध्ये त्यांनी पेटंट मिळवले आहे. सध्या डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटल येथे बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंटमध्ये त्या काम करत आहेत.

कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तरे होणार आहेत. कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे. सगळ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 19-04-2025