खेड : खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या तिघांच्या अटकपूर्व जामिनावर २४ एप्रिलला सुनावणी

खेड : दहा लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या तीन संशयितांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येत्या २४ एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

विशाल घोसाळकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन तहसीलदार कार्यालयात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. तक्रारीत नमूद केल्यानुसार, या खंडणीपैकी एक लाख रुपये स्वीकारण्यात आले होते. याप्रकरणी त्या तिघांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अस्मिता साळवी करत आहेत. आता न्यायालय या तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर करते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 19/Apr/2025