खेड : येथील पंचायत समितीच्या आवरातील शिक्षण विभागाच्या जुन्या इमारतीलगत मोकळ्या जागेत शिक्षकांच्या उपक्रमांसाठी हक्काचे शिक्षक भवन उभे राहणार आहे. यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या सभागृहांमध्येच राबविले जातात. मात्र, अनेकवेळा यासाठी जागेची कमतरता भासते.
या पार्श्वभूमीवर शिक्षक भवनाची उभारणी करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर मंजुरीसाठी पाठवला होता. पालकमंत्री उदय सामंत व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठपुराव्यानंतर यासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. या भवनाच्या वाढीव बांधकामासह अन्य सुविधांची उपलब्धतता करून देण्यासाठी आणखी दहा लाख रुपये अपेक्षित असल्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. वाढीव निधीही उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मंत्री कदम यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 19/Apr/2025
