नांदिवडे येथील ग्रामस्थांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील जयगड नजीकच्या नांदिवडे येथील अंबू फाटा येथे उभारण्यात येणाऱ्या गॅस टर्मिनलच्या स्थलांतरासाठी १४ एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले होते. याबाबत २५ एप्रिल २०२५ रोजी अधिकाऱ्यांनी कंपनीच्या वरिष्ठांबरोबर प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समिती नांदिवडे सोबत सभा घेऊन स्थलांतराविषयी चर्चा करू, असे पत्र दिले. त्यामुळे हे आंदोलन बुधवारी तात्पुरत्या स्थगित केले आहे.

रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत गॅस टर्मिनलचे काम पूर्णतः बंद राहील, असे लेखी निवेदन दिले आहे. कंपनी अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय दिला नाही. तर २५ एप्रिलपासून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल, असे प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीने सांगितले. प्रहारचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आंदोलन उभारण्यात येईल. जोपर्यंत लोकवस्तीतून गॅस टर्मिनल स्थलांतर होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू राहील, असे सांगण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 19/Apr/2025