Dapoli Heavy Rain: दापोलीत मुसळ’धार’; चैतन्यनगर आणि गिम्हवणे येथे घरांमध्ये शिरले पाणी

केळस्कर नाका पूर्णपणे पाण्याखाली; गुडघाभर पाण्यातून वाहनचालक आणि नागरिकांची मोठी कसरत

दापोली:

Dapoli Heavy Rain (दापोलीत मुसळधार पाऊस) मुळे संपूर्ण तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दापोली शहरातील केळस्कर नाका परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यामुळे पादचारी नागरिक आणि वाहनचालकांना रस्त्यावरून प्रवास करताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह रहिवासी भागांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

जालगाव परिसरातील घरांमध्ये पाणी; नागरिकांचे हाल

सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जालगाव येथील चैतन्यनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा योग्य रीतीने न झाल्याने हे पाणी थेट अनेक नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. दापोली शहरातील अंतर्गत रस्ते जलमय झाले असून, केवळ घरांमध्येच नव्हे तर आजूबाजूच्या शेतांमध्येही पाणी घुसल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे आणि रहिवाशांचे मोठे नुकसान झाले आहे.

गिम्हवणे परिसरात घरांचे नुकसान

दापोली शहरालगत असलेल्या गिम्हवणे परिसरातही या पावसाचा तीव्र फटका पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे गिम्हवणे येथील शराफत बुरोंडकर यांच्या घरात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. अचानक घरात पाणी शिरल्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले असून, परिसरातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने इतर घरांनाही याचा धोका निर्माण झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 06-07-2026