गणपतीपुळेत दर्शन रांगा दिसणार नव्या रूपात

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरासमोरील मुख्य दर्शन रांगांचे काम सध्या नव्याने सुरू झाले आहे. त्यामुळे या दर्शन रांगा आता नव्या रूपात दिसणार आहेत. गणपतीपुळे मंदिराच्या देवबाग परिसरात असलेल्या जागेत भक्तगणांसाठी सध्या तात्पुरत्या स्वरूपात दर्शन रांगांची व्यवस्था संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या पंच कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.

गणपतीपुळे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या दर्शन रांगांवरचे छप्पर अत्यंत जीर्ण स्वरूपाचे झाले होते. तसेच ते मोडकळीस येण्याचे चिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे या दर्शनरांगा नव्याने करण्याबाबत संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या पंच कमिटीच्या वतीने निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या पंच कमिटीच्या वतीने नव्याने काम सुरू करण्यात आले आहे. तसेच गणपती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील मोरया गेटजवळ असलेल्या देवळीचे काम ही सध्या नव्याने सुरू झाले आहे. त्यामुळे या देवळीलाही आता आकर्षक रूप चढणार आहे.

दरम्यान, एकूणच संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या वतीने सध्या मंदिराचा नव्या स्वरूपात कायापालट सुरू असून विविध ठिकाणांहून येणाऱ्या भक्तगणांमध्ये व स्थानिक ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 19/Apr/2025