हर्णे समुद्रात सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ बेपत्ता खलाशाचा मृतदेह सापडला; श्रीवर्धन येथील मच्छिमाराचा बुडून मृत्यू

हर्णे समुद्रात सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ बेपत्ता खलाशाचा मृतदेह सापडला; श्रीवर्धन येथील मच्छिमाराचा बुडून मृत्यू

दोन दिवसांपूर्वी बोटीवरून झाला होता गायब; दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

*दापोली :* दापोली तालुक्यातील हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या बाजूस समुद्रात एका खलाशाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मासेमारी बोटीवर काम करणारा हा खलाशी दोन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. त्याचा शोध सुरू असतानाच रविवारी दुपारी समुद्रात त्याचा मृतदेह आढळून आला. रोहीदास यशवंत धरणकर (वय ४० वर्षे, रा. कोळीवाडा, ता. श्रीवर्धन, जि. रायगड) असे मयत खलाशाचे नाव असून, याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बोटीवरून झाला होता बेपत्ता; समुद्रात शोध सुरू :*

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन कोळीवाडा येथील रहिवासी रोहीदास धरणकर हे हर्णे बंदर परिसरातील एका मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करत होते. गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास ते बोटीवर होते; मात्र दुसऱ्या दिवशी, २ ऑक्टोबरच्या सकाळपासून ते बोटीवर आढळून आले नाहीत. ते समुद्रात पडल्याचा संशय आल्याने सहकारी मच्छिमारांनी खाडी आणि समुद्राच्या परिसरात शोधमोहीम हाती घेतली होती.

Ronic

सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ पाण्यावर तरंगताना आढळला मृतदेह :

रविवार, दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या बाजूला समुद्रात सातवाव अंतरावर एक मृतदेह पाण्यावर तरंगताना मच्छिमारांच्या निदर्शनास आला. जवळ जाऊन पाहिले असता तो बेपत्ता खलाशी रोहीदास धरणकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. मच्छिमारांच्या मदतीने मृतदेह समुद्राबाहेर आणून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद :

या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:५३ वाजता आकस्मिक मृत्यू (आमृ) क्रमांक ७४/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ चे कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.