लांजा : इंदवटी येथे ३ मे रोजी जिल्हास्तरीय भव्य पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील इंदवटी येथे दिनांक ३ मे रोजी श्रीदेव धाववा मंदिर समितीच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य दिव्य पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा श्री देव धावबा मंदिर पटांगण इंदवटी येथे होणार आहे .या स्पर्धेतील प्रथम विजेत्या पालखी नृत्य मंडळाला रोख रुपये ११,१११ व आकर्षक चषक असे पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे.द्वितीय विजेत्यांना रोख रुपये ७,७७७ व आकर्षक चषक तर तृतीय विजेत्या मंडळाला रोख रुपये ,३३३३ व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे उत्कृष्ट ढोल वादक, ताशा वादक, उत्कृष्ट निशाणी, उत्कृष्ट झांज वादक, सनई वादक, उत्कृष्ट देखावा यांना देखील आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

श्री देव धाववा मंदिर समिती इंदवटी यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेबाबत नाव नोंदणीसाठी जयवंत जाधव मोबाईल ८४५९४८०४६६, विजय जाधव मोबाईल -९४२३८७५२६४ आणि विलास पांचाळ ९५२९४३५६४४ यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे.

Radhakrushna patapedhi

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:50 19-04-2025