दापोलीत हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण

दापोली : तालुक्यातील मौजे आडे येथील राजलक्ष्मी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या संदेश बजरंग पिळणकर (वय ४५) यांना सचिन साळवी नावाच्या व्यक्तीने खुर्चीने मारहाण करून जखमी केले. ही घटना १९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता घडली. याबाबतची तक्रार पिळणकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात रात्री ९.२५ वाजता दाखल करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदेश पिळणकर हे राजलक्ष्मी हॉटेलमध्ये काम करत असताना संशयित आरोपी सचिन साळवी तेथे मोटारसायकलवरून आला. चिंचघर गावातील पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून त्याने पिळणकर यांना ‘तू इथे कसा काय आला आहेस’ असे विचारून शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने पिळणकर यांची कॉलर पकडली आणि हॉटेलमधील खुर्ची उचलून त्यांच्या डोक्यात सहा वेळा मारली, ज्यामुळे पिळणकर जखमी झाले.

दापोली पोलिसांनी आरोपी सचिन साळवी याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 21-04-2025