खेड : लोटे वसाहतीमधील कंपनीचे गोडावून फोडून सव्वा लाखाचे इलेक्ट्रिकचे सामान चोरीला

रत्नागिरी ः खेडमधील लोटे वसाहतीमधील कंपनीचे गोडावून फोडून अज्ञात चोेरट्याने सुमारे सव्वा लाख रुपयांचे इलेक्ट्रिकचे सामान चोरून नेले. ही घटना रविवार 6 एप्रिल रोजी मध्यरात्री 1.20 ते 2 वाजण्याच्या कालावधीत घडली आहे.

याबाबत दत्तात्रय रामचंद्र वाघमोडे (57) यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, अ‍ॅक्वीला ऑरगॅनिक प्रा. लि., लोटे एमआयडीसी येथील कंपनीच्या गोडावूनच्या स्लायडिंगच्या खिडक्या उचकटून ती अज्ञात संशयितांनी तेथील इलेक्ट्रिकल नॉन एफ. एल.पी. ग्लँड व एफ. एल. पी. ग्लँड, लोडसेल वायर व लोड सेल असेम्ब्ली इत्यादी मिळून 1 लाख 16 हजार 251 रुपयांचे साहित्य कारमधून चोरून नेले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 21-04-2025

Fitness