खेड : गांजा प्रकरणांसह १४ लाखांची फसवणूक व अन्य गुन्ह्यांप्रकरणी तपासकार्यात केलेल्या यशस्वी कामगिरीची दखल घेत येथील पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांना जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते प्रशंसनीय कामगिरीने सन्मानित करण्यात आले. तपासकामात सहकार्य करणाऱ्या अन्य ११ पोलिस कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.
तपासकार्यात सहकार्य करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपक गोरे, पोलिस कॉन्स्टेबल वैभव ओहोळ, रूपेश जोगी, सुमित नवघरे, रोहित जोयशी, प्रकाश पवार, राहुल कोरे, महिला कॉन्स्टेबल शबाना मुल्ला, सारिका चाळके या कर्मचाऱ्यांनाही प्रशंसनीय कामगिरीने सन्मानित करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 22/Apr/2025













