रत्नागिरी शहरातील अंतर्गत रस्ते खड्डेमय

रत्नागिरी : पावसाने विश्रांती घेण्यास सुरुवात केल्याने आणि कडक ऊन पडू लागल्याने शहरात खड्डे भरण्याचे काम नगर परिषदेकडून सुरु करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांत मुख्य रस्त्यावरच्या अनेक ठिकाणी खराब झालेल्या रस्त्यावर डांबरीकरणाचे पॅच मारण्यात आले. आता शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे कधी भरणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

गणेशोत्सवाला प्रारंभ होण्यापूर्वी शहरातील रस्त्यांवरचे खड्डे भरण्याचे नियोजन रत्नागिरी नगर परिषदेकडून करण्यात आले होते. परंतु, पाऊस उसंतच घेत नसल्याने मुख्य रस्त्यावरचे आणि अंतर्गत रस्त्यांवर काही ठिकाणी भर पावसातच खड्डे भरण्यात आले.

शहरातील काही ठिकाणी पॅच मारण्यात आले. भरलेले खड्डे पुन्हा पावसाने धुवून काढले. त्यामुळे आता पाऊस कमी होवून ऊन पडू लागल्यानंतर त्या ठिकाणी खड्डे भरण्याचे आणि पॅच मारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर अनेक खड्डे आहेत. ते कधी भरणार, याकडे रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.

Khabardar diwali fest

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:04 18-09-2024